माखजन हायस्कूल येथे वाचन प्रेरणा दिन साजरा

माखजन |वार्ताहर :    संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळा च्या माखजन इंग्लिश स्कूल येथे डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.यादिवशी अभिवाचन स्पर्धा,पुस्तक प्रदर्शन आदी विविध कार्यक्रम घेण्यात आले.

माखजन इंग्लिश स्कूल चे वाचनालय समृद्ध असून सुमारे २ हजार पुस्तके आहेत.यातील विविध प्रकारातील पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात आली होती.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त ठेवलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळा चे अध्यक्ष आनंद साठे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष मनोज शिंदे,सचिव राजेश फणसे,संस्था संचालक दत्ताराम गुरव,कुलदीप भागवत,सतीश साठे ,मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,ग्रंथपालं श्रीरंग कुंभार उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार सचिन साठे यांनी मानले.