कुणकेश्वरचा ‘पावणाई ग्रुप’ द्वितीय, तर वेंगुर्लेचा ‘उत्कर्ष ग्रुप’ तृतीय
फॅन्सी ड्रेस स्पर्धेत देवेंद्र घाटे, विरा पारकर प्रथम
गणेश सजावट स्पर्धेत संजय तारकर प्रथम
इंद्रधनू देवगड या संस्थेच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील अनुसया कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या खुल्या ग्रुप दांडिया स्पर्धेत रत्नागिरीच्या संघर्ष दांडिया ग्रुपने प्रथम क्रमांक मिळविला. या संघाला भाजप युवा मोर्चा देवगड जामसंडे शहर अध्यक्ष दयानंद पाटील यांच्या हस्ते रोख ११ हजार १११ रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धेत खुल्या गटात देवेंद्र घाटे यांनी, तर लहान गटात विरा मनोज पारकर हिने प्रथम व मांक मिळविला.
खुल्या ग्रुप दांडिया स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर भाजप युवा मोर्चाचे देवगड-जामसंडे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, वेदा हॉलिडे रिसॉर्टचे व्यवस्थापक अनिकेत बांदिवडेकर, इंद्रधनूचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, उपाध्यक्ष किसन सूर्यवंशी, सचिव प्रशांत वाडेकर, खजिनदार तुषार पाळेकर, सहसचिव उदय रुमडे आदी उपस्थित होते. खुल्या दांडिया स्पर्धेत एकूण नऊ संघांनी सहभाग घेतला होता. यात पावणाई दांडिया ग्रुप- कुणकेश्वर संघाने द्वितीय, तर उत्कृर्ष दांडिया ग्रुप- वेंगुर्ला संघानेतृतीय क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांकप्राप्त पावणाई दांडिया ग्रुप- कुणकेश्वरला रोख ७ हजार ७७७ रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक तसेच तृतीय क्रमांक प्राप्त उत्कर्ष दांडिया ग्रुप- वेंगुर्ला संघाला रोख ५ हजार ५५५ रुपये, सन्मानचिन्ह, प – शस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी रवळनाथ दांडिया ग्रुप पुरळ, समर्थ दांडिया ग्रुप- कुणकेश्वर, त्रिमूर्ती दांडिया ग्रुप- वेंगुर्ले, हौशी कलाकार ग्रुप- देवगड, श्री देव तांबळेश्वर भगवती दांडिया ग्रुप- वेंगुर्ले, दिर्बाई दांडिया ग्रुप खाकशी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण संजय पेटकर (कणकवली), हेमलता पटेल, सुशिला पटेल यांनी केले. स्पर्धेचे बहारदार सूत्रसंचालन संजय धुरी यांनी केले.
स्थानिक कलाकारांचा विशेष गौरव
नवरात्र उत्सव कालावधीत दांडिया नृत्यात सहभागी झालेल्या स्थानिक कलाकारांचा संस्थेच्यावतीने विशेष गौरव करण्यात आला. यात बेस्ट बॉय- लक्ष्म वाल्मिकी, बेस्ट गर्ल- ओवी खडपकर, बेस्ट कॉस्च्युम- शिवानी मेस्त्री, बेस्ट लेडी- रेणुका अक्षिमणी, बेस्ट जेण्टस् उमेश वायंगणकर, बेस्ट कॉस्च्युम (लेडी ) शुभ्रा चांदोस्कर यांना गौरविण्यात आले.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील खुल्या गटात द्वितीय संज्योत रुमडे, तृतीय महेश जोशी, उत्तेजनार्थ योगेश बगार, दत्तगुरु लाड यांनी यश मिळविले. तर लहान गटात द्वितीय सिया यतीन कुळकर्णी, तृतीय कार्तिक जितेंद्र गिरकर, उत्तेजनार्थ अस्मी सहस्त्रबुद्धे, आराध्य गोडवे यांनी यश मिळविले. खुल्या गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय व -मांकांच्या विजेत्यांना रोख ३ हजार रुपये २ हजार रुपये, दीड हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. तर लहान गटातील विजेत्यांना अनुक्रमे २ हजार रुपये, दीड हजार रुपये, १ हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. दोन्ही गटातील उत्तेजनार्थ क्रमांकांना रोख बक्षिस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण सरस्वती कलामंदिरचे सुहास जोशी व मिलिंद सदानंद पवार प प्राथमिक शाळेचे शिक्षक स्वप्नील सुतार यांनी केले. सूत्रसंचालन संजय धुरी, ऋत्विक धुरी यांनी केले.
गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
गणेश चतुर्थी कालावधीत इंद्रधनू देवगड संस्थेमार्फत देवगड- जामसंडे नगर पंचायत कार्यक्षेत्रात घेण्यात आलेल्या गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांनाही यावेळी गौरविण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक संजय तारकर (तरवाडी), द्वितीय व क्रमांक भगवान कोयंडे (आनंदवाडी), तृतीय क्रमांक शैलेश भुजबळ (साईनाथवाडी) यांनी मिळविला. स्पर्धेचे परीक्षण रामदास जगताप यांनी केले होते. दरम्यान, नवरात्र उत्सवातील स्पर्धांना भाजप युवा मोर्चाचे देवगड- जामसंडे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, उद्योजक प्रकाश गायकवाड, हॉटेल ‘प्रपंच’चे प्रफुल्ल भावे, कुळकर्णी सुपर शॉपीचे सुनील कुळकर्णी यांचे सहकार्य लाभले.
{छाया वैभव केळकर }