वेंगुर्ले नगरवाचन स्पर्धेतही न्यू इग्लिश उभांदाडा चा करिष्मा

वेंगुर्ले । प्रतिनिधी : जिल्ह्यात आपला वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या न्यू इग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा अश्वमेध कायम राखताना वेंगुर्ले नगरवाचनालयात संपन्न झालेल्या विविध स्पर्धेत यश मिळवत आपल्या विद्यालयाची विजयी घोडदौड कायम राखली ज्ञानेश्वरी ओवी पठन स्पर्धेत या विद्यालयाची इयत्ता नववीची विद्यार्थ्यांनी श्रुती शेवडे हिने चतुर्थ क्रमांक पटकावला तीला तिचे वडिल श्रीधर शेवडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या प्रशालेचा जीवन गावडे यानी नाट्यगीत गायन स्पर्धेत बाजी मारली त्याला लौकिक प्राप्त भजनीबुवा आणि माऊली संगित विद्यालयाचे सर्वेसर्वा वैभव परब ,तुळस यांनी विशेष मार्गदर्शन केले. क्रातीवीर सावरकर या वक्तृत्व स्पर्धेत आठवीची साक्षी तुळसकर तर माझे श्रध्दास्थान स्वामी विवेकानंद या वक्तृत्व स्पर्धेत रोशनी मोटे हाने तृतीय क्रमांक पटकावला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना या प्रशालेचे अध्यापक श्री वैभव खानोलकर सर आणि श्री अजित केरकर यांनी मार्गदर्शन केले,या उल्लेखनीय यशा बद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.वाळवेकर सर संस्था अध्यक्ष श्री विरेंद्र कामत आडारकर सुप्रसिद्ध रांगोळीकार आणि विद्यमान सचिव रमेश नरसुले माजी गटशिक्षण अधिकारी आणि विद्यमान उपाध्यक्ष रमेश पिंगुळकर या सह सर्व संस्था पदाधिकारी यांनु यशप्राप्त विद्यार्थी आणि मार्गदर्शक श्री खानोलकर सर आणि अजित केरकर याचे ही अभिनंदन केले.विद्यालयाला मिळालेले या उल्लेखनीय यशा बद्दल या सर्व स्तरातुन कौतुक होत आहे