मंडणगड l प्रतिनिधी : मंडणगड शहरातील स्वागत बार येथे दारू पिण्यासाठी बसलेले असताना श्याम कांबळे राहणार समर्थ नगर भिंगळोली मंडणगड वय 49 यांच्या डोक्यात पाण्याने भरलेला मग मारून दुखापत केल्याप्रकरणी राकेश गायकवाड राहणार कूंबळे यांच्या विरोधात मंडणगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यासंदर्भात फिर्यादी कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कांबळे हे दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास स्वागत बार् येथे दारू पिण्यासाठी बसलेले असताना या ठिकाणी राकेश गायकवाड येऊन टेबलावर भरलेला स्टीलचा पाण्याचा मग उचलून त्यांच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले कांबळे यांच्या तक्रारीनुसार मंडणगड पोलिसांनी गायकवाड यांच्या विरोधात माधवी कलम 324, 427 अन्वये गुन्हा दाखल केला आहे यासंदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास मांडवकर करीत आहेत.









