मंडणगड l प्रतिनिधी : मंडणगड पोलिसांनी तपासणी नाक्यावर तपासणी केली असता एसटी गाडीतून दारू वाहतूक केल्याप्रकरणी मोहन सखाराम शेडगे वय 50 राहणार सावरी फाटा घोसाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे त्या संदर्भात पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहिती प्रमाणे मंडणगड पोलीस स्थानक यांच्याकडून दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी पालवणी चेक पोस्ट येथे तपासणी नाका लावून तपासणी करण्यात येत असताना सायंकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास मंडणगड ते पेवेकोंड जाणाऱ्या एसटी बस क्रमांक एम एच 20 बी एल 0362 या गाडीमध्ये तपासणी केली असता मोहन शेडगे यांच्याकडे 2730 रुपये किमतीची देशी दारू आढळून आली आहे याचप्रमाणे 3600 रुपये किमतीची विदेशी दारूच्या बाटल्या सापडून आल्या आहेत दारूबंदी कायदा अन्वये मोहन शेडगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या संदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुहास मांडवकर अधिक तपास करत आहेत










