The general meeting held after eight years was extremely successful due to the presence of all parties, the absence of account heads was conspicuous, the review was incomplete
मंडणगड | प्रतिनिधी : आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 17 एप्रिल 2023 रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आमदार योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आलेली मंडणगड पंचायत समिती आमसभा सत्ताधारी व विरोधक यांच्या उपस्थितीमुळे कमालीची यशस्वी ठरली. केंद्रशसनाच्या जलजीवन मिशन योजनेचे नियोजन व अंमलबजावणी चे प्रश्नावर ही सभा वादळी ठरण्याचे अंदाज वर्तवीले जात असताना या सभेबाबत सत्ताधारी व विरोधक प्रचंड जागरुक असल्याचे दिसून आले. विविध खात्यांचा आढावा घेत असताना सभेच्या अध्यक्षांनी अतिशय हुषारीने पाणी पुरवठा विभागाचा आढावा घेण्याचे टाळत आयत्या वेळीच्या विषयात या विभागाचे प्रश्न उपस्थित करण्याची अनुमती दिल्याने प्रश्नांची सरबत्ती करण्यास इच्छुक असलेल्या विरोधकांची मोठी अडचण झालेली दिसून आली. सभा संपली तरी प्रश्न मात्र संपले नव्हते प्रश्न कर्त्यांचे प्रश्न सुरु होते. सुमारे सहा तासाहून अधिक काळ सभेचे कामकाज चालून सुध्दा निम्याहुन विभागाचे आढावे घेण्यास वेळच न मिळल्याने अनेकांना आपल्या तक्रारी लिखीत स्वरुपात देण्याचे व त्याचे सात दिवसांचे आत उत्तर देण्याचे अध्यक्षांनी सुचीत केले. सभेच्या सुरुवातीस अभिनंदनाचे ठराव झाल्यावर अध्यक्षांनी सभेस सर्व खातेप्रमुखांची हजेरी घेतल्याने कामकाज गाजण्याचे संकते मिळत असतानाच खात्याचा आढावा सुरु झाला सभेत मांडण्यात आलेले वेगवगेळे ठराव प्रत्यक्षात सभेच्या कामकाजात येणार का याचे उत्तर सभेचे इतिवृत्त कायम झाल्यावरच स्पष्ट होणार आहे.
सभेदरम्यान, महसुल विभाग, महावितरण, सार्वजनीक बांधकाम, पंचायत समिती बांधकाम, तालुका आरोग्य विभाग, ग्रामिण रुग्णालय या पाचच विभागांचा आढाव पुर्ण करण्यात यश आले आहे. त्यामुळे विकास कामांचे प्रश्न व अनेक मुद्यांवर अधिकाऱ्यांचे संरक्षण करण्याकरिता अध्यक्षांना सभेदरम्यान अनेक विषयात स्वतः हस्तक्षेप करण्याची वेळ आली असे असली तरी तालुक्याचे अनेक रखडलेल्या विकास कामांचे मुद्यावंर अध्यक्ष आश्वासक भुमीका घेताना दिसून आले. दुसरीकडे आढावा घेण्यात आलेले अधिकारी सभेस आलेले असताना कोणतेही आकडेवारी सोबत घेऊन न आल्याने त्यांनी सभेची कोणतेही तयारी अथवा नियोजन केलेले नसल्याचे प्रकर्षाने जाणवून आले. त्यामुळे अध्यक्षांची अधिकाऱ्यांवरील नाराजी जाहीरपणे दिसून आली, दुसरीकरणे सभेचे आमंत्रण वेळेवर जावूनही दहा खात्यांचे अधिकारी या सभेस अनुपस्थित असल्याचे दिसून आले. सभेस अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा ठराव करावा अशी मागणी माजी उपसभापती दोस्तमहंमद चौगुले यांनी केलेली दिसून आली. सभेस उपस्थित राहणाऱ्या खातेप्रमुखांचा तयारीच्या अभावाचे चित्र सातत्याने दिसत आले. अध्यक्षांनी आपणाकडे किती आर्ज आले किती मार्गी लावले किती प्रलंबीत आहेत याची मागणी केली असताना एकाही अधिकाऱ्यांकडे आकडेवारी आढळून आली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमतामुळे निकृष्ठ दर्जाचे काम होत आहे. खड्डे बुजवण्याची एएमसी योजनेतील कामे केवळ ठेकेदार नजरेसमोर ठेवून केली जातात. २५ ते ३० टक्के कमी दारात निविदा भरून ही कामे केली जातात. याकामांमध्ये ठेकेदार व अधिकारी यांचे संगनमत असल्याने शंकेला वाव असतो, लोकप्रतिनिधीनाही या कामांबाबत विश्वासात घेतले जात नाही. त्याचे परिणाम लोकप्रतिनिधीना भोगावे लागत असल्याचे स्पष्टमत यावेळी स्वतः अध्यक्षांनी सभेदरम्यान मांडले व सार्वजनिक बांधकाम विभागावर जाहीर नाराजी व्यक्त केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रमोद कदम महिन्यातून एकदा किंवा दोनदाच मंडणगड येथील कार्यालयात उपस्थित राहत असल्याचे निदर्शनात आणून देत एका ग्रामस्थाने अध्यक्षांसमोर उपअभियंता प्रमोद कदम यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. उपअभियंता श्री. कदम हे कार्यालयात भेटायला गेल्यास कधीच उपस्थित नसतात. आम्हाला सातत्याने गैरहजर राहणारे अधिकारी नको आहेत असे सांगत या ग्रामस्थाने अध्यक्षांसमोर अक्षरशः विनंती करत तालुक्याला बांधकाम विभागासाठी उपअभियंता या पदासाठी पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी केली. दीर्घकाळानंतर झालेली सभा तालुकावासीयांच्या उपस्थितीची आघाडीवर कमालीची यशस्वी ठरली तरी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे गाजली असेच म्हणावे लागले याशिवाय अध्यक्षांनी सुचना करुनही खात्याशी संबंधीत नसलेले प्रश्न दुरावान्वये संबंधीत जोडून उपस्थित करुन चर्चेचे गुराळे रंगवण्यात आल्याने अनेक खात्याचा आढावाच घेता येणे शक्य झाले नाही. या सभेस दापोलीच्या विभागीय प्रांत अधिकारी भाग्यश्री मोरे, तहसिलदार संजय भिसे, गटविकास अधिकारी विशाल जाधव, मुख्याधिकारी विनोद डवले, माजी सभापती आदेश केणे, रामदास रेवाळे, भाई पोस्टुरे, माजी जि.प. सदस्य, संतोष गोवळे, प्रकाश शिगवण, अस्मिता केंद्र, नितीन म्हामुणकर, सुलतान मुकादाम, अनंत लाखण, प्रमोद जाधव, मुश्ताकर मिरकर, अप्पा मोरे, उपनराध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसेवक आदेश मर्चंडे व विविध खात्यांचे अधिकारी व ग्रामपंचायतीचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे प्रस्तावीक गटविकास अधिकारी विशाल जाधव यांनी तर सुत्रसंचालन शिक्षक शांताराम पवार यांनी केले. सभा यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सर्वसामान्यांचे व्यासपिठी लोकप्रतिनिधीने केले काबीज- प्रशासकीय यंत्रणाकडून सुरु असेलल्या विकास कामाची तसेच विविध योजनांची शेवटच्या घटकास माहीती व्हावी याचबरोबर नागरीकांच्या यंत्रणेशी संबंधीत व्यक्तीगत अडचणींचे निवारण व्हावे या उद्देशाने आमसभेत आयोजन केले जाते. मात्र यंदाचे चित्र काहीसे वेगळेच होते. सर्वसमान्यांचे व्यासपिठ तालुक्यातील लोकप्रतिनिधी या नात्याने विविध पदे भुषविणारे लोकप्रतिनीधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी काबीज केले. प्रस्थापितांचे प्रश्नच संपत नसल्याने उपस्थित असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न विचारण्यास संधी मिळाली नाही, आमसभेच्या दरबारातून किती सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्न मार्गी लागले, किती विकासाचे कामे मार्गी लागली, अडचणीचे मुद्यांची किती उकल झाली या प्रश्नाची उत्तरे मात्र गुलदसत्याच राहीली आहेत.
आमसभेच्या व्यासपिठावरुन आगामी निवडणुकांचे चित्र स्पष्ट- विपरीत राजकीय परिस्थितीमुळे 2024 च्या निवडणुक सगळीकडे परवलीचा शब्द बनला आहे. 2024 ची तयारी अत्तापासून सुरु झाली असल्याची साक्ष या आमसभेतून मिळाली. विद्यमान आमदारांना सरळ अथवा पडद्यामागून समर्थन करणारी तालुक्यातील बहुतांश सत्ताकेंद्रे व्यासपिठावर विराजमान झालेली दिसून आली तर विरोधात असणारे सभास्थानी समोर असलेल्या खुर्च्यांमध्ये बसून प्रश्न उपस्थित करत आमदार अथवा त्यांच्या समर्थकांना टिकेचे लक्ष करताना दिसून आले. 2024 अथवा लगेच निवडनुक झाल्यास तालुक्यात कोण कोणाल समर्थन करेल यांचे चित्र आमसभेच्या व्यासपिठाने तालुकावासीयांसमोर जवळ जवळ स्पष्ट झाले आहे.यावर दावे प्रतीदावे केले जात असले तरी मतदारांसमोर दोन्ही गटांचे चित्र बऱ्यांच अंशी स्पष्ट झाले आहे.










