निलेश राणे हे आमचे मार्गदर्शक आणि नेतृत्व

त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय मागे घ्यावा- महेश खामकर व भाजपा पदाधिकारी

 लांजा( प्रतिनिधी) निलेश राणे हे आमचे मार्गदर्शक आणि नेते आहेत. त्यामुळे त्यांनी राजकारणातून संन्यास घेणे हे आमच्यासाठी क्लेशदायक असून त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी कळकळीची मागणी लांजा तालुक्यातील तमाम भाजपा पदाधिकारी आणि निलेश राणे समर्थक कार्यकर्ते यांनी केली आहे.

भाजपाचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याचे जाहीर केल्यानंतर लांजा तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते आणि निलेश राणे समर्थक नाराज झाले आहेत.या बोलताना भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष महेश खामकर म्हणाले की, निलेश राणे यांनी आम्हाला लढायला शिकवले. त्यांनी सर्वसामान्य कामा कार्यकर्त्यांना लढण्याची ताकद दिली. आमचे स्फूर्ती स्थान आहेत. ते त्यामुळे अशा प्रकारे ते राजकारणातून संन्यास घेणे हा निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यामुळे त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी आम्हा तमाम लांजा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची विनंती आहे

‌. त्यामुळे माजी खासदार आणि आमचे नेतृत्व निलेश राणे यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी माजी तालुकाध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष महेश खामकर तसेच जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, नगरसेवक परिमल भोसले, लांजा नगरसेवक संजय यादव ,जिल्हा सचिव हेमंत शेट्ये ,नंदकुमार चव्हाण, संकेत चवंडे ,योगेंद्र सावंत, संजय निवळकर, अरविंद लांजेकर ,अशोक गुरव, महेंद्र शेडे, गुरुप्रसाद तेली, तसेच प्रवीण सुर्वे बाबा राणे, ओमकार आंब्रे, शिवा लांजेकर, सुयोग तोडकरी, विराज हरमले, अशोक वाडेकर ,नित्यानंद दळवी ,विश्वजीत जेधे, बाबा सुर्वे, समीर कोत्रे, बन्सी गांधी यांनी केली आहे.