रत्नागिरी ः प्रतिनिधी : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीच्या वतीने 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत भ्रष्ट्राचार निर्मुलन जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी कार्यालयामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत,रिक्षा संघटना,व्यापारी संघटना येथे भ्रष्ट्राचार निर्मुलन बैठका,शाळा व महाविद्यालयामध्ये व्याख्यान,चर्चासत्र,निबंध स्पर्धा,पथनाट्य,योगा वर्ग,व्यायामशाळा व जेष्ठ नागरिक यांचे चर्चासत्र इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.या सप्ताहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे अवाहान करण्यात आले आहे.











