दोडामार्ग : प्रविण परब : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांचे बांदा येथे भव्य स्वागत करण्यात आले. पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डान्टस, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, जिल्हा संपर्कप्रमुख शेखर माने, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सावंतवाडी विभागीय युवक अध्यक्ष विवेक गवस, तालुका सचिव गौरांग शेर्लेकर, प्रशांत पांगम, समीर सातार्डेकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












