चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुका बौदधजन हितसंरक्षक समिती मुख्य स्थानिक यांच्या सूचनेनुसार गाव शाखा तिथं आपल्या सामाजिक वस्तीच्या प्रवेश द्वाराजवळ संस्थेच्या विभाग गाव शाखेच्या नावाचा बोर्ड लावण्यात यावा त्यानुसार कळमुंडी शाखेने वर्षावास निमित्त नामफलकाचे अनावर कळमुंडी शाखेचे ज्येष्ठ सभासद माजी अध्यक्ष, माजी पोलीस पाटील, माजी सरपंच काशिराम धर्मा मोहिते, ज्येष्ठ सभासद काशिराम सावंत यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण केले.यावेळी कळमुंडी शाखेचे स्थानिक अध्यक्ष विकास मोहिते, कळमुंडी मुंबई शाखेचे अध्यक्ष अनिल सावंत, चिटणीस सचिन सावंत, सर्व पदाधिकारी, महिला मंडळ, बोधीछाया तरूण मंडळ, शाखेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी सभासद, सल्लागार भगवान मोहिते, ग्रा. पं. सदस्या, उपसरपंच वैष्णवी सावंत, महिला मंडळ अध्यक्षा अर्पिता अजित मोहिते, ज्येष्ठ सभासद सुनिल सावंत, मुंबई विभाग प्रतिनिधी दिनेश सावंत, अजय मोहिते सर्व सभासद, शाखेचे सभासद, विभाग प्रतिनिधी, संस्थेचे स्थानिक तालुका उपाध्यक्ष, साहित्यिक राष्ट्रपाल सावंत उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल विभाग अध्यक्ष प्रमोद कांबळे, तालुका अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी कळमुंडी शाखेचे अभिनंदन केले आहे.











