राजापूर (प्रतिनिधी): राजापूर पंचायत समितीचे माजी प्रभारी गटशिक्षणाधिकारी सखाराम कडु यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वार्तेने तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
सखाराम कडु यानी राजापूर तालुक्यात गेली अनेक वर्ष केंद्रप्रमुख म्हणुन कार्यभार सांभाळला होता त्यानंतर त्यांच्या कामाची पध्दत व वक्तशिरपणा पाहता त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा परिषदेने राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणुन जबाबदारी सोपवली होती . सुमारे वर्षभर प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणुन त्यानी यशस्वीपणे कार्यभार सांभाळला होता . त्यानतर गेल्या वर्षभरापुर्वीच ते प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणुन सेवानिवृत्त झाले होते . सेवा निवृत्तीनंतर त्यानी सामाजिक क्षेत्रात आपले योगदान दिले होते . गेल्या काही दिवसांपासुन त्यांची तब्बेत अचानक बिघडली होती. रत्नागिरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीने तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .












