कातवड शाखाप्रमुख हनू धुरींचा भाजपामध्ये प्रवेश
मालवण | प्रतिनिधी : कोळंब गावात शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला असून कातवड शाखाप्रमुख हनुमंत उर्फ हनु धुरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोळंब ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचा सरपंचसहित ग्रामपंचायत मध्ये एकहाती सत्ता आली होती. मात्र, काही दिवसातच शिवसेनेत नाराजी नाट्य सुरु झाले आहे असे चित्र दिसत आहे. कातवड शाखाप्रमुख हनु धुरी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला आहे. कोळंब गावचा विकास हा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनीच केला आहे. यापुढेही गावातील विकासकामे नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून होतील.
त्यामुळे नेतृत्वावर विश्वास ठेऊन आपण भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे हनुमंत धुरी यांनी सांगितले. तसेच गाव अध्यक्ष विनायक धुरी, ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण हे नेहमी येथील लोकांच्या अडीअडचणीच्या काळात धावून येतात. त्यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करण्यात येईल असेही धुरी यांनी सांगितले. यावेळी गाव अध्यक्ष विनायक धुरी, उपाध्यक्ष विजय सारंग, ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, भाऊ फणसेकर, हेमंत परब, प्रसाद भोजणे, किशोर आचरेकर, अमित लोके, उमेश चव्हाण, दीपक कोरगावकर, हनुमंत चौगुले, सत्यवान लोके, कृष्णा चव्हाण, मोहन आचरेकर, निलेश परब, समीर चव्हाण आदी उपस्थित होते.