‘ पायी हळूहळू चाला मुखाने भालचंद्र बोला’ अशा नामघोषात पालखी मिरवणुकीला सुरुवात …!

ढोल-तशांच्या गजराने शहरातील वातावरण बनले उत्सवी व भक्तीमय…!

दशावतारी नाट्यप्रयोगाने होणार उत्सवाची सांगता…!

कणकवली
‘पायी हळूहळू चाला मुखाने भालचंद्र बाबा बोला’, ‘परमहंस भालचंद्र महाराज की जय’ अशा नामघोषात परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. भालचंद्र महाराज यांच्या नामघोष आणि ढोल-तशांच्या गजराने शहरातील वातावरण उत्सवी व भक्तीमय बनले होते. या पालखी सोहळ्यामुळे कणकवलीनगरी भक्तीरसात न्हाऊन गेली.
भालचंद्र महाराज संस्थान येथून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली यामध्ये घोडे यांच्यासह वारकरी संप्रदायातील वारकरी भाविक भक्त या पालखीत सहभागी झाले होते.
ही पालखी मिरवणूक पटकी देवी ते बाजारपेठ ढालकाटी येथून केली आणि मार्गे छत्रपती शिवाजी चौक मुंबई गोवा हायवे मार्ग कणकवली पटवर्धन चौक ते बाजारपेठ भालचंद्र महाराज संस्थान येथे या पालखी मिरवणुकीची सांगता होणार आहे. या पालखी मिरवणुकीच्या मार्गावर काही मंडळाकडून तर काही स्वखर्चातून अल्पोआहारचे वाटप करण्यात आले.
परमहंस भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भालचंद्र महाराज संस्थान व वाळकेश्‍वर मंगल कार्यालयातर्फे उत्सवाकालावधीत दीपोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत भालचंद्र महाराज यांच्या पालखीचा मार्ग असलेल्या मंडळ व घरांसाठी सजावट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत मंडळ व घरांनी सहभागी दर्शवला. शहरातील काही जणांनी आपल्या घरासमोर भालचंद्र महाराज यांची प्रतिकृती तयार केली होती. ररस्त्याचा बाजूला आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. या रांगोळ्या लक्षवेधी ठरल्या. मंडळांनी आकर्षक अशी सजावट देखील केली होती. या मिरवणुकीत आकर्षण ठरले ते मेघडमरीत बसलेल्या बाबांच्या मूर्तीच्या देखाव्याचे या देखाव्याचे काहींनी आपल्या मोबाईलवर फोटो काढत याची आठवण साठवून ठेवली. रात्रौ भालचंद्र महाराज यांच्या पालखी सोहळ्या नंतर संस्थानमध्ये दीपोत्सव कार्यक्रमाचे पारितोषिक वितरणत करण्यात येणार आहे. रात्रौ दशावतारी नाट्यप्रयोग होणार असून उत्सवाची सांगता होणार आहे.