तब्बल ५१ हजारांची दंडात्मक कारवाई
कणकवली : अनेक पालक वाहन कायद्याचे नियम धाब्यावर बसवून आपल्या मुलांना शाळा – कॉलेज मध्ये जाण्यासाठी वाहन देतात. मात्र वाहन देण्यापूर्वी ते वाहन चालवण्याबाबत असलेले नियमांचे पालन करताना दिसत नाही.
कणकवली शहरात सोमवारी कणकवली कॉलेज नजिकच्या रस्त्यावर, डीपी रोड व कणकवली पटवर्धन चौक, या ठिकाणी तब्बल २० वाहनांवर विना लायसन वाहन चालवणे, पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता थांबले नाही, ट्रिपल सीट, विना नंबर प्लेट, गाडीला आरसा नसणे, वाहन चालवताना मोबाईल संभाषण करणाऱ्या २० वाहन चालकांवर ५१ हजार रुपयांची दंडात्मककारवाई करण्यात आली आहे.
त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना तसेच इतर वाहनचालकांनी वाहन चालवताना नियमांचे तंतोतंत पालन करून वाहन चालवणे गरजेचे आहे. अन्यथा अशी वाहन किंवा वाहनचालक सापडली तर दंडात्मक कारवाईचा फटका बसू शकतो. त्यामुळे मुलांना गाड्या देताना नियमांचे पालन करा, असे आवाहन कणकवली पोलीस ठाणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तर या कारवाईत वाहतूक पोलीस विनोद चव्हाण व आर. के. पाटील हे सहभागी झाले होते.