विद्यामंदिर च्या उप शिक्षिका सौ.प्राजक्ता कुबल यांचा निवृत्ती पर झाला निरोप समारंभ

शाळा,विद्यार्थी, शिक्षक यांच्या आठवणींना उजाळा देत हृदय आले भरून

कणकवली :विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या हिंदी विषयाच्या अध्यापिका सौ . प्राजक्ता कुबल यांच्या सेवानिवृती निमत्त शुभेच्छा व सत्कार समारंभ संपन्न झाला . सौ कुबल आपल्या नियत वयोमानानुसार ३३ वर्षचा प्रदीर्घ सेवेतून ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रशालेतून निवृत्त झाल्या. या कार्यक्रमाला विद्यामंदिर प्रशालेचे सर्व आजी – माजी शिक्षक व स्नेही उपस्थित होते.

विद्यामंदिर प्रशालेत त्यांच्या सेवानिवृती निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. प्रशालेचे मुख्याध्यापक पी.जे.कांबळे यांनी त्यांच्या महत्चाच्या गुणांचे पैलू उलगडून सौ कुबल मॅडम यांना शुभेच्छा आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या . यावेळी सौ सावंत मॅडम श्री संदिप कदम . पर्यवेक्षिका सौ जाधव मॅडम श्री अच्युत वणवे, निवृत्त शिक्षक श्री तानवडे सर ‘ सौ मानगावकर माजी मुख्याध्यापक श्री सावंत श्री सरवदे श्री खांबल श्री नाडकर्णी आदी उपस्थित होते . या शुभेच्छा सत्कार सोहळ्याचे निवेदन श्री सिंगनाथ सर यांनी केले . आभार सौ केळुसकर मॅडम यांनी मानले. यावेळी विद्या मंदिर प्रशालेचे सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित हाते. तसेच इंग्लिश स्कूल व प्राथमिक विभागातील सर्व अध्यापक उपस्थित होते.