‘वंदे भारत’ आजपासून शुक्रवार वगळता ६ दिवस सुसाट !

खेड | प्रतिनिधी : कोकणवासियांच्य सर्वाधिक पसंतीस उतरलेली अलिशान मुंबई- मडगाव वंदे भारत एक्सप्रेस १ नोव्हेंबरपासून आठवड्यातील शुक्रवार वगळता ६ दिवस नियमितपणे धावणार आहे. ३१ ऑक्टोबरपासून वंदे एक्सप्रेसचा वेगही वाढला आहे. प्रवास आता १० तासांवरून अवघ्या ७ तास ४५ मिनिटांवर येणार आहे.

दीपावली सुट्ट्या हंगामासह सलग सुट्ट्यांमुळे कोकण मार्गावरून धावणारी वंदे भारत एक्सप्रेस हाऊसफुल्लच धावणार आहे. सुपरफास्ट सीएसएमटी मुंबई- मडगाव वंदे भारत एक्सप्रेस कोकण मार्गावर सोमवार, बुधवार, शुक्रवार, तर परतीच्या प्रवासात मंगळवार, बुधवार, शनिवारी धावत आहे. आठवड्यातील ६ दिवस धावणार आहे. १ नोव्हेंबरपासून २२२२९ क्रमांकाची सीएसएमटी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी सुटून दुपारी १ वाजून १० मिनिटांनी मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात २२२३० क्रमांकाची मडगाव-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस मडगाव येथून दुपारी २.४० वाजता सुटून रात्री १०.२५ वाजता सीएसएमटी मुंबई स्थानकात पोहचेल.