वैभववाडी l प्रतिनिधी : एडगाव – वायंबोशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.स्मृती संतोष पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पवार यांच्या निवडीनंतर गावात त्यांचे अभिनंदन केले जात आहे. यावेळी एडगाव सरपंच रविना तांबे, माजी उपसरपंच सौ. सायली घाडी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रमोद रावराणे, सोसायटी चेअरमन सुनिल रावराणे, ग्रा.पं. सदस्य श्री रविंद्र रावराणे, दत्ताराम पाष्टे, सौ. प्रज्ञा रावराणे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजु पवार, रविंद्र तांबे, योगेश पवार, सखाराम फाळके, ग्रामसेवक श्री घुगे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.