गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन इंग्लिश स्कूल माखजन व अॅड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी,व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक संतोष कुलकर्णी यांनी केले.
व्यासपीठावर संस्था अध्यक्ष किशोर साठे,उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर,सचिव दीपक पोंक्षे,सहसचिव दीपक शिगवण,नवनिर्वाचित मुख्याध्यापक महादेव परब,इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मुख्याध्यापिका श्रीमती धनश्री राजेसावंत भोसले,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,आदी उपस्थित होते
या कार्यक्रमात गुरुकुल पूरक उपक्रमातील विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली.तर विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करत लोकमान्य टिळकांच्या व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा घेतला.यावेळी ट्रस्ट तर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले.याचे वाचन ज्येष्ठ शिक्षिका सौ कांचन जंगम यांनी केले.
माखजन इंग्लिश स्कूल व अॅड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक महादेव परब याना संस्था,शाळा,इंग्लिश मिडियम स्कूल तर्फे बुके देत सन्मान करण्यात आला.व शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी मुख्याध्यापक महादेव परब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणातून किशोर साठे यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजच्या विद्यार्थ्यांच्या प्रगती साठी किती महत्वाचे आहेत हे विशद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव पोंक्षे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक अंबादास घाडगे यांनी मानले.












