पुनस ग्रामपंचायतीच्या वतीने बांधण्यात आला बंधारा

पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेंतर्गत उपक्रम

लांजा( प्रतिनिधी) तालुक्यातील पुनस ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने पुनस सावंतवाडी पुलाजवळील वहाळावर बंधारा बांधण्यात आला रविवारी पाच नोव्हेंबर रोजी हा बंधारा बांधण्यात आला.

पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेंतर्गत हा बंधारा बांधण्यात आला आहे .हा बंजारा बांधण्यामध्ये पूनस ग्रामपंचायतचे सरपंच संतोष लिंगायत तसेच ग्रामसेवक प्रबोध कीर आणि त्याची टीम, ग्रामपंचायत सदस्य नितेश कुंभार ,रश्मी सावंत, शिल्पा कांबळे, संकेत गावडे, माजी सरपंच इलियाज बंदरी तसेच रमेश नेमण याबरोबरच गावातील स्थानिक कार्यकर्ते राजू साळवी, अशोक माटल, काशिनाथ माटल ,रमेश माटल ,रणजीत माटल, अमोल लाखन ,मुन्ना शेख आदी सहभागी झाले होते.

या बंधार्‍याचा उपयोग येथील विहिरीच्या

पाण्याची भूजल पातळीत वाढ होण्यास तसेच जनावरांना पाणी पिण्यास होणार आहे.