इसवली पनोरे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची बाजी

पोटनिवडणुकीतील विजयाने शिवसेना शिंदे गटाने खोलले खाते

लांजा( प्रतिनिधी) तालुक्यातील इसवली पनोरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत शिवसेना( शिंदे गटाने) दोन्ही जागांवर विजय संपादन केला असून उबाठा गटाला जोरदार धक्का दिला आहे.

तालुक्यातील इसवली पनोरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोन मधील दोन जागांसाठी रविवारी ५ नोव्हेंबर रोजी पोट निवडणूक झाली होती. सोमवारी ५ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालांती या दोन्ही जागांवर शिवसेना शिंदे गटाने विजय संपादन केला आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या अदिती अमोल मेस्त्री (१८९ मते) आणि मधुरा मंगेश मेस्त्री (१९० मते )घेऊन विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेना उबाठा गटाच्या समीधा संतोष आग्रे आणि सलोनी संतोष कवचे यांचा पराभव केला.

ही निवडणूक शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि रत्न सिंधू योजनेचे सदस्य किरण उर्फ भैया सामंत यांच्या नेतृत्वाखाली अब्रार बरमारे यांनी या निवडणूक यशस्वीपणे हाताळून हा विजय संपादन केला आहे. यासाठी दीपक कदम तसेच रोहिदास मेस्त्री, उदय मेस्त्री, रवींद्र मेस्त्री, राजाराम मेस्त्री, मंगेश कवचे

आणि सर्व सुतारवाडी ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली .

पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर विजय संपादन केल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी फोन करून अब्रार बरमारे यांचे विशेष अभिनंदन केले.तर लांजा शहरातील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयासमोर फटके वाजून आणि घोषणाबाजी करून जोरदार जल्लोष करण्यात आला यावेळी लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत, शहर प्रमुख सचिन डोंगरकर, युवा सेनेचे प्रसाद भाईशेट्ये ,तसेच संजय तेंडुलकर, युवा सेना तालुका अधिकारी राजू धावणे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान या पोटनिवडणुकीतील विजयाने शिवसेना शिंदे गटाने तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचे खाते खोलले आहे.