लोकमान्य वाचनालयात पार पडला केशवसुतांच्या कवितांची ‘काव्यमाला’ कार्यक्रम

लांजा : (प्रतिनिधी) कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा लांजाच्यावतीनेकवी केशवसुत जयंती महोत्सव अंतर्गत आयोजित केशवसुतांच्या कवितांची ‘काव्यमाला’ या कार्यक्रम लोकमान्य वाचनालय, लांजा येथे पार पडला.
कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरीचे जिल्हा सचिव राजेश गोसावी, कोमसाप लांजा शाखेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, उपाध्यक्षा डॉ. माया तिरमारे, माजी मुख्याध्यापक भीमराव खोत, कोमसाप लांजा शाखेचे कोषाध्यक्ष प्रकाश हर्चेकर, जिल्हा प्रतिनिधी बाळू नागरगोजे, सदस्य रामचंद्र लांजेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रथम रामचंद्र जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर डॉ. माया तिरमारे यांनी केशवसुतांच्या साहित्यिक कारकीर्दीचा आढावा घेतला. बाळू नागरगोजे, खावडी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई व रिया लिंगायत यांनी कवितांचे रसग्रहण केले. सविता पाटील, गणेश झोरे, नुपूर नागरगोजे, मेहक भानुशाली, लावण्या कुरूप, माया तिरमारे यांनी केशवसुतांच्या कवितांचे वाचन केले. भीमराव खोत, राजेश गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश हर्चेकर यांनी केले. कार्यक्रमाला विजयालक्ष्मी देवगोजी, मुलाणी, सौ. देसाई, श्रावणी हर्चेकर, सुरेखा विभुते, शुभम नागवेकर आदींसह कवी, श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, सचिव अरबाज नेवरेकर, प्रकाश हर्चेकर, विनोद बेनकर, बाळू नागरगोजे, सविता पाटील, डॉ. माया तिरमारे, सविता पाटील, यांनी मेहनत घेतली.