आयएमए च्या महाराष्ट्र शाखेतर्फे डॉ. तोरल शिंदे यांचा नवदुर्गा सन्मान देऊन गौरव

रत्नागिरी | प्रतिनिधी : कोकणातील प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ तोरल निलेश शिंदे यांचा नवदुर्गा सन्मान देऊन इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला. कोकणामध्ये वंध्यत्व या आजारावर काम करण्याऱ्या डॉ. तोरल शिंदे यांचे याबाबत ग्रामीण भागात विशेष कार्य आहे. केवळ स्त्री रोग तज्ञ म्हणून व्यवसाय न करता कोकणातील महिलांच्या मुलभूत अडचणींचा अभ्यास करून त्यांनी रत्नागिरीत कोकणातील पहिले टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरु केले. येथील अत्याधुनिक उपचारांमुळे अनेक महिलांना मातृत्वाचा आनंद घेता आला आहे.

त्यांच्या या कार्याची दखल आजवर अनेक संस्था आणि व्यासपीठानी घेतली आहे. नुकताच त्यांचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेतर्फे शाखेचे अध्यक्ष डॉ. कुटे यांच्याहस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन नवदुर्गा सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रम चिपळूण येथे पार पडला. यावेळी व्यासपीठावर चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण आणि मान्यवर उपस्थित होते.