संगमेश्वर तालुक्यात शत प्रतिशत भाजपा च लक्ष्य : रुपेश कदम
माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा च्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ. सुषमा बने यांचा अटीतटीच्या लढतीत नेत्रदीपक विजय मिळवला.यानंतर भाजपा च्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. संगमेश्वर तालुका भाजपा ची सध्या आदरणीय पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील शत प्रतिशत भाजपा साठी ची यशस्वी घौड दौड सुरु असल्याचे मत भाजपाचे संगमेश्वर तालुका अध्यक्ष (दक्षिण) यांनी प्रसार माध्यमाना दिली.मोदी साहेबांच्या कार्यशैली मुळे प्रभावित होऊन अनेक अन्य पक्षातील लोक भाजपा मध्ये जाहीर प्रवेश करत असल्याचे मत श्री रुपेश कदम यांनी व्यक्त केले.संगमेश्वर तालुक्यातील ग्रामस्थांचा भाजपा वरचा वाढता विश्वास आणि पक्ष प्रवेश लक्ष्यात घेता, शत प्रतिशत भाजपाचे स्वप्न साकार होताना दिसत असल्याचे श्री कदम म्हणाले.संगमेश्वर तालुक्यात भाजपाचा विजयाचा झंझावात सुरु झाला असून,तळेकांटे गावचा विजय ही नांदी असल्याचे रुपेश कदम यांनी सांगितले.यावेळी संदीप बने यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार मानले.भाजपा नेते श्री.रवींद्र चव्हाण, श्री.निलेश राणे,जिल्हा अध्यक्ष श्री.राजेश सावंत, श्री.प्रमोद अधटराव यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा चे कार्यकर्ते जोरदार कामाला लागले असल्याचे नमूद केले.











