उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांचा उपक्रम
राजापूर | प्रतिनिधी : कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपूरला जाणाऱ्या राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघातील सर्व भाविकांसाठी मोफत एसटीबस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी सर्व भाविकांनी पंढरपूर यात्रेला जाण्यासाठी व परत येण्यासाठी आवश्यक त्या सर्व एसटी बस मोफत पुरविण्याचे जाहिर केले आहे. तशी माहिती राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप व राजापूर तालुका प्रमुख अशफाक हाजू व लांजा तालुका प्रमुख गुरूप्रसाद देसाई यांनी पत्रकारांना दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफ करतानाच मोफत एसटी बस सेवाही पुरविली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता ना. सामंत यांच्याकडून राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघातुन कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या सर्व भाविकांसाठी मोफत एसटी बस सेवा पुरवीली जाणार आहे. भाविकांना पंढरपूरला जाताना व परत राजापूरकडे आपल्या गावी येताना ही मोफत एसटी बस सेवा असणार आहे.
प्रसिध्द उदयोजक व युवा नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वतीने यासाठी नियोजन केले जात असून गावागावातुन या यात्रेसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांनी यासाठी राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप व राजापूर तालुका अध्यक्ष अशफाक हाजू व लांजा तालुका प्रमुख गुरूप्रसाद देसाई यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.











