नाव गोपनीय ठेवून आरोपींना वाचविण्याचा कणकवली पोलिसांचा प्रयत्न फसला
कणकवली पोलीस ठाण्याची मात्र राज्यात झाली बदनामी
कणकवली ( प्रतिनिधी)
शिवसेनेचे पदाधिकारी आणि बिडवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच असलेल्या सुदाम तेली यास वाळूच्या गुन्ह्यातून वगळण्याचा कणकवली पोलिसांचा प्रयत्न अखेर फसला. कणकवली पोलीस निरीक्षक अनिल जाधव, आणि तपासी अधिकारी असलेले पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांनी फिर्याद देवून सुद्ध आरोपींची नावे गोपनीय ठेवून काहींना अटक करून शिवसेनेच्या सुदाम तेल यांना सोडून देण्याचा चालविलेला प्रयत्न अखेर फसला. कणकवली तालुक्यातील पत्रकारांनी या संदर्भात रोखठोक भूमिका घेत आरोपींची नावे गोपनीय ठेवण्यावर आवाज उठवल्याने अखेर या प्रकरणातील उर्वरित आरोपी अटक करावे लागले.त्यात सुदाम तेली यास आज अटक करण्यात आली.तर या प्रकरणी एक एक करत गेल्या दहा दिवसात आठ आरोपी अटक करण्यात आले आहेत.
६ जानेवारी रोजी बिडवाडी येथे मध्यरात्री
वाळू माफियांनी संगणमत करून मालवण तहसीलदारांवर बेकायदेशीर जमाव करून वाळू विरुद्ध ची कारवाई करण्यास प्रतिकार केला. या घटनेतील मुख्य आरोपी म्हणून बिडवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि ठाकरे शिवसेनेचा पदाधिकारी असलेल्या सुदाम तेली यास कणकवली पोलिसांनी दहा दिवसांनी आज आटक केली आहे.
मालवण येथून वाळूचे भरलेले ट्रक बेकायदेशीर रित्या कणकवली च्या दिशेने घेऊन जात असताना मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी पाठलाग करत कणकवली तालुक्यातील बिडवाडी या गावात हे सर्व ट्रक पकडले. त्यानंतर ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी असलेले आणि बिडवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच असलेले सुदाम तेली यांनी अन्य लोकांना जमून तहसीलदारांना घेराव घातला होता. उलट पूलट चर्चा करून, धमकी देवून कारवाई करण्यास विरोध केला होता. आणि बेकायदेशीर वाळूवर कारवाई करता येणार नाही अशा पद्धतीची धमकी देत, तहसीलदार आणि त्यांच्या पथकाल माघारी पाठवले होते. या सर्व प्रकरणात मालवण तहसीलदार यांनी रीतसर तक्रार केल्यानंतर कणकवली पोलिसांनी उपसरपंच सुदाम तेली यांचे नाव गुपित ठेवले होते.मात्रा आज अखेर ही अटकेची कारवाई करण्यात आली.आरोपीला पाठीशी घालण्याच्या या प्रकारामुळे कणकवली पोलीस ठाण्याची फारमोठी बदनामी झाली आहे.