विलवडे माऊली मंदिरात  ‘श्री हरीनाम सप्ताह’ आज 

 

ओटवणे(प्रतिनीधी) विलवडे गावचा श्री देवी माऊली मंदीरात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही हरिनाम सप्ताह संपन्न होत असून आज गुरुवारी ९ नोव्हेंबर राेजी रमा एकादशी निमित्त सात प्रहरचा ‘अखंड श्री हरीनाम सप्ताह’ साजरा होणार आहे. विशेष कार्यक्रम सायं.७ ते रात्री ९ वाजेपर्यंत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असणारी महिलांची दिंडी. दुसर्‍या दिवशी शुक्रवारी दुपारी १.३० वाजता

महाप्रसाद होणार आहे. व सप्ताहाची सांगता होणार आहे तरी भजनप्रेमी,भाविकांनी कार्यक्रमास उपस्थीत राहून दर्शन घ्यावे असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळकृष्ण दळवी यांनी केले आहे.