लांजा( प्रतिनिधी) संस्कृती फाऊंडेशन लांजा तर्फे सलग ११ व्या वर्षी स्वरबहार दिवाळी संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
संस्कृती फाऊंडेशन लांजा कडून दरवर्षीप्रमाणे ‘स्वरबहार’ दिवाळी संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले आहे.यंदा या उपक्रमाचे ११ वे वर्ष आहे.या कार्यक्रमात विविध गीते सादर केली जाणार असून नृत्य आणि विनोदी सादरीकरणदेखील होणार आहे.हा कार्यक्रम १४ नोव्हेंबर संध्याकाळी ६ वाजता लांजाचे ग्रामदैवत श्री देव चव्हाटा मंदिराच्या भव्य पटांगणात होणार आहे.
यामध्ये सचिन पवार,गुरू नांदगावकर,शैलेश शिंदे, रणजित झोरे, अभय पाध्ये, रामदास चव्हाण,रसिका रावणंग,मधुरा लाकडे,राजेश गोसावी आदी गायन करणार असून कुणाल पाटील आणि ग्रुप विविध नृत्य सादर करणार आहेत.तर किशोर साळुंखे विनोदी स्किट व विनायक खानविलकर साई बाबांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
यासाठी संगीतसाथ सिंथेसायजर राजू किल्लेकर,तबला केदार लिंगायत,पखवाज मंदार जाधव,ढोलकी कौस्तुभ सुतार,हार्मोनियम शंकर मुळे अशी संगीत साथ असणार आहे.तर या कार्यक्रमाचे निवेदन योगेश शेट्ये विशाखा पावसकर व राजेश गोसावी करणार आहेत.
कार्यक्रम विनामूल्य असून या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्कृती संस्थापक राजेश गोसावी,अध्यक्ष गौतम कांबळे,उपाध्यक्ष संतोष म्हेत्रे व सचिव विनोद बेनकर यांनी केले आहे.










