चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या परजिल्ह्यातील व परराज्यातील व्यवसायिकाना कडक शब्दात समज
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील कामगारांनी मालवण येथे जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर व्यवसायात शिरकाव केला आहे. नियमबाह्य पद्धतीने ते हा व्यवसाय करत असून स्थानिकांना याचा फटका बसत आहे. याप्रशनी स्थानिक डंपर, जेसीबी, ट्रॅक्टर व डम्पर व्यवसायिकांच्या व्यवसायिकांनी या विरोधात आवाज उठवत परजिल्ह्यातील या व्यवसायिकांना कडक शब्दात समज दिली आहे. तसेच परप्रांतीय कामगारांनी मनमानी पद्धतीने मजुरी दर वाढवले आहेत. ते दरही निश्चित करावेत. अशीही भूमिका यावेळी मांडण्यात आली.
काही परजिल्ह्यातील व्यावसायिक यात राजकारण करण्याचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या विषयात कोणीही राजकारण न करता स्थानिक व्यवसायिकांच्या पाठीशी राहावे, असेही उपस्थितानी सांगितले.
मालवण मधील बांधकाम संबंधित व्यवसायात कर्नाटक, विजापूर आदी तसेच जिल्ह्या बाहेरील कामगारांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मजुरीचे दरही यांनी मनमानी पद्धतीने वाढवून ठेवले आहेत. कामही काही तसाच केले जाते. तसेच यातीलच काही कामगारांनी आपल्या राज्यातील ट्रॅक्टर, जेसीबी व डंपर मालवणात आणून बांधकाम व इतर गोष्टीसाठी लागणारी सेवा देण्यास सुरुवात केली. यातील काही वाहने शेतीसाठी वापर म्हणून घेऊन या व्यवसायात आणली आहेत. तर काही वाहनांबाबत साशंकता आहे. व्यवसाय करताना हे कामगार स्थानिक व्यवसायिकांची कामे मिळावीत यासाठी कमी दर आकारल्याचे भासवत आहेत. प्रत्यक्षात मालवण येथील व्यावसायिक नियमानुसार तसेच सर्व कर भरणा करत असल्याने त्यांचे दर निश्चित असतात. मात्र परजिल्ह्यातील या कामगारांच्या चुकीच्या व्यवसाईक स्पर्धेमुळे स्थानिक व्यवसायिकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. याबाबत गेले काही दिवस स्थानिक व्यवसायिकांकडून समजावण्याचे प्रयत्न सुरु होते. सुरु असून या व्यवसायिकांना मज्जाव करण्याबाबत बैठका घेण्यात येत होत्या. मात्र यात राजकारण करण्याचा प्रयत्न या परजिल्ह्यातील व्यावसायिक यांनी केला.
त्यामुळे सय्यमाची भूमिका घेण्याऱ्या स्थानिक व्यावसाय संतप्त झाले. मालवण शहर देऊळवाडा येथे स्थानिक व्यवसायिकांनी संबंधित परप्रांतीय व्यवसायिकांना शुक्रवारी एकत्र बोलावत कडक शब्दात समज दिली.
यावेळी उद्योजक राजा गावडे, उद्योजक प्रीतम गावडे, शैलेश नामनाईक, हरीश गांवकर, राजू बिडये, बाळा वस्त, दादा नाईक, बंडू वळंजू, श्रेयस माणगावकर, अक्षय माणगावकर, दत्ता गावडे, सुरज धुरी, सुरेश नाईक, दादा पालव, प्रसाद आडवणकर, आरिफ शेख, प्रसाद मुंबरकर, वळंजू व इतर व्यावसायिक उपस्थित होते.
यावेळी राजा गावडे व इतर व्यवसायिकांनी परजिल्ह्यातील व परराज्यातील या व्यवसायिकांशी चर्चा केली. वाद वाढत असल्याने परप्रांतीय व्यवसायिकांनी आपापले जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर घेऊन आपले गाव गाठावे, आम्ही शांततेने संयमाने सांगत आहोत. आम्हाला वाद करायचे नाहीत मात्र चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करून स्थानिक व्यवसाईकांना जर कोणी त्रास देत असेल तर ते सहन केले जाणार नाही असे राजा गावडे यांनी सांगितले.
यावेळी शैलेश नामनाईक म्हणाले, जे परप्रांतीय व्यावसायिक जेसीबी, ट्रॅक्टर, व डंपर द्वारे व्यवसाय करत आहेत त्या पैकी काही जेसीबी, ट्रॅक्टर, व डंपरची नोंदणी त्यांच्या राज्यात झालेली असून तें चुकीच्या पद्धतीने याठिकाणी व्यवसायासाठी वापरण्यात येत आहेत. अन्य काही नियमही पाळले जात नाहीत. या व्यवसायिकांमुळे स्थानिक व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे यापूढे परप्रांतीय व्यावसायिक आम्हाला मालवणात नको, अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही आमच्या संघटनेत ठरल्याप्रमाणे करू. तसेच स्थानिक नागरिकांनी देखील स्थानिक व्यवसायिकांना प्राधान्य देऊन सहकार्य केले पाहिजे. असेही आवाहन यावेळी करण्यात आले.











