वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे जलबांदेश्वर-बंदर येथील झुलत्या पुलानजिक उपक्रम..
वेंगुर्ला | प्रतिनिधी : दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे जलबांदेश्वर-बंदर रोड झुलत्या पुलानजिक दिवाळी फराळ व इतर आकाश कंदील, पणत्या प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल लावण्यात आले असून याचे उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते झाले.
महिला बचतगटांनी मेहनतीने बनविलेल्या घरगुती खाद्यपदार्थांना स्थानिक बाजारपेठ मिळावी तसेच आकाश कंदिल, पणत्या अशा विविध वस्तूंची विक्री व्हावी व यातून महिलांनी आर्थिक उन्नत्ती साधावी यासाठी वेंगुर्ला नगरपरिषद प्रोत्साहन देत आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी ५ ते रात्रौ ९ या वेळेत हे प्रदर्शन आणि विक्री सुरू राहणार असून नागरिकांनी याची खरेदी करावी असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.