फ्रेंड्स ग्रुप लांजा च्या वतीने एकाच वेळी उजळवणार १८ हजार दीप

कोकणातील सर्वात मोठा दीपोत्सव

लांजा( प्रतिनिधी) फ्रेंड्स ग्रुप लांजा च्या वतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून रविवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता न्यू इंग्लिश स्कूल लांजा च्या पटांगणावर भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी १८ हजार दीप हे एकाचवेळी प्रज्वलित करण्यात येणार आहेत.

फ्रेंड्स ग्रुप लांजाच्या वतीने साजरा करण्यात येणारा दीपोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा दीपोत्सव म्हणून ओळखला जातो. दरवर्षी प्रमाणे

या वर्षीही हा दीपोत्सव तितक्याच दिमाखात साजरा केला जाणार आहे .या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे जसजसे या दिपोत्सव कार्यक्रमाला वर्ष होत गेली तसतसा या उत्सवातील प्रज्वलित करण्यात येणाऱ्या दीपांची संख्यादेखील वाढत गेली आहे. यावर्षी या दीपोत्सवात १८००० दीप एकाच वेळी प्रकाशमान करण्यात येणार आहेत.

या प्रकाशमान आनंद सोहळ्याला तमाम लांजा वासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फ्रेंड्स ग्रुप लांजा च्या वतीने विजय हटकर यांनी केले आहे.

____________________________________