उबाठा चे वेतोरे पालकरवाडी ग्रा.पं. सदस्य दिनकर पालव यांचा शिवसेनेत प्रवेश

वेंगुर्ले | प्रतिनिधी : वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे पालकरवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, माजी उपसरपंच आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी दिनकर पालव यांनी आज दीपावलीच्या शुभमुहूर्तावर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यामुळे विकास कामांना तालुक्यात गती मिळत आहे. आपल्या भागाचाही विकास व्हावा या उद्देशाने आज दिनकर पालव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, तालुका संघटक बाळा दळवी तसेच बबलू कुडतरकर, आडेली ग्रामपंचायत सदस्य सुधीर धुरी, बाळू सावंत, सचिन राऊळ, मितेश परब, सावली आडारकर, मयुरी आरोलकर, कृतिका कुर्ले आदी यावेळी उपस्थित होते.