सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी
रात्री जेवणानंतर नरकासुर पाहायला कसाल बाजारपेठेत येत असलेल्या मोटरसायकल स्वरांना अज्ञात वाहनाने मागून ठोकल्याने झालेल्या अपघातात कसाल येथील 26 वर्षीय तरुण प्रथमेश दिलीप बागवे हा मृत झाला तर सिद्धेश्वर दिनकर बागवे 32 हा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री 12:20 वाजन्याच्या दरम्याने झालेला अपघात एवढा भयानक होता की संबंधित अज्ञात वाहनाने ही मोटर सायकल एक किलोमीटर अंतर पर्यंत घासत नेली आहे.
नरकासुराची रात्र कसाल मधील तरुणांच्या जीवनात काळ रात्र ठरली आहे. कसाल बागवेवाडी येथे राहणारे सिद्धेश्वर बागवे आणि प्रथमेश बागवे हे दोघेजण होंडा एक्टिवा या गाडीने मुंबई गोवा महामार्गावरून कसाल बाजारपेठेतील नरकासुर पाहण्यासाठी येत होते. सिद्धेश्वर मोटरसायकल चालवत होता तर प्रथमेश त्याच्या मागे बसला होता. हे दोघेही कसाल हायस्कूल समोर आले असता त्यांच्या मागुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यानंतर या दोघांसह त्यांना शंभर मीटर अंतरापर्यंत या गाडीने फरफटत नेले. त्यानंतर दोघेपण गाडीवरून खाली पडले. तर त्यांची एक्टिवा संबंधित अज्ञात वाहनाने एक किलोमीटर अंतरापर्यंत नेली.
या अपघातात प्रथमेश बागवे हा जागीच ठार झाला. तर सिद्धेश्वर याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या हाताला तसेच बरगड्यांना गंभीर दुखापत झाली असून, त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे, या अपघाता संदर्भातली खबर मिळताच कसा मधील सर्व लोक धावून आले. मात्र यापूर्वीच ते अज्ञात वाहन गायब झाले होते. संबंधित अज्ञान वाहन हे बलेरो पिकप असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान ही गाडी महामार्गावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याबाबतची खबर मिळाल्यावर सिंधुदुर्गनगरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गनगरी पोलीसांनी अपघात स्थळाचा पंचनामा केला आहे. सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन कदम हे अपघाताचा अधिक तपास करत आहेत.
प्रथमेश त्याच्या पश्चात वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. प्रथमेश इमारतींना प्लास्टर करण्याचे काम करत असे. या अपघातामुळे कसाल परिसर हादरून गेला आहे.