चिपळूण (प्रतिनिधी) : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. भारतात दिवाळी हा सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवाळीत नवीन कपडे, फराळ, घरांना रंगरंगोटी, आकाश कंदील, पणती, रांगोळी अशा सर्वच गोष्टींचे तयारीत प्रत्येकजण असतो. मात्र या गोष्टीसोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे किल्ला.दिवाळीत अनेकजण आपापल्या घरी किल्ला बनवतात. आकर्षक रंग, त्याची तटबंदी अशा अनेक बारकाव्यांची काळजी हा किल्ला बनवताना बाळ गोपाळांसह मोठेही घेतात. असाच किल्ला असगोलीमधील किर कुटुंबीयांनी बांधला आहे.
अमर कीर यांचा मुलगा क्षितिज कीर, पुतण्या रुद्र कीर यांनी श्रेयस झगडे, देवेंद्र गुरव, अर्णव कनगुटकर, शुभ्रा कनगुटकर, स्नेहल मोरे, निधीश कनगुटकर, अस्मी कनगुटकर, अन्वित कनगुटकर, अद्विक कनगुटकर, प्रियंका कीर या मित्राच्या मदतीने हा किल्ला आपल्या घरच्या अंगणात साकारला आहे. अतिशय मनमोहक आणि प्रशस्त किल्ला असगोली गावातील कीर कुटुंबीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास जपण्याच्या हेतूने बच्चे कंपनीने किल्ले बनवून शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियाच्या युगात वावरणारी ग्रामीण भागातील बच्चे कंपनी आजही किल्ले बनवण्याच्या विधायक उपक्रमात स्वतःला गुंतवताना दिसत आहेत. दिवाळीमध्ये बच्चे कंपनी आणि युवक, युवती देखिल निरनिराळे किल्ले, गड, सामाजिक देखावे साकारून कला आणि पारंपरिक सामाजिक देखावे साकारून कला आणि पारंपरिक संस्कृती जपताना दिसून येत आहेत. रायगड किल्ला, प्रतापगड, सिंधुदुर्ग गड, कर्नाळा अशा प्रसिद्ध किल्ल्यांची प्रतिकृती असगोली परिसरातील गावागावापरिसरातील गावागावात तयार करणयात आल्याचे दिसून येत आहे.