आमदार श्रीकांत भारती उद्या मालवण दौऱ्यावर

मालवण | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी मार्फत मालवण शहराचा पर्यटन दृष्ट्या विकास होण्यासाठी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी ज्या सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी मोरयाचा धोंडा येथे केली. मोठा ऐतिहासिक वारसा असूनही ऐतिहासिक दृष्ट्या व पर्यटन दृष्ट्या आवश्यक असणारा विकास अधिक प्रमाणात करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मालवण कुडाळ भाजप विधानसभा संयोजक माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून आवश्यक निधी आणि शाश्वत पर्यटन दृष्ट्या विकास याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास काही गोष्टी आणून देण्यात आल्या. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आमदार श्रीकांत भारती व महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर सेल भाजपा डॉ. अमेय देसाई मालवण शहराच्या विकासाच्या दृष्टीकोणातून पाहणी करण्यासाठी शुक्रवार १७ नोव्हेंबर सकाळी १२ वाजता मालवण शहरात येत आहे. १२:३० मोरया चा धोंडा येथे पाहणी व चर्चा, दु.१.२० मालवण भारतीय जनता पार्टी कार्यालयास भेट, दु.१.५० वा. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी कामाचा आढावा घेण्यात येणार आहे.

या दौऱ्यात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत,
तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा प्रवक्ता बाबा मोंडकर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हाउपाध्यक्ष भाजपा सिंधुदुर्ग तथा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी केले आहे.