खेड | प्रतिनिधी)खेड तालुक्यातील घाणेखुंट येथील जय भवानी मित्र मंडळाने गावातील अनेक घरांमध्ये वापरात न येणारे लहान मुलांचे स्वेटर जमा करून दिवाळीच्या मुहूर्तावर लोटे येथील झोपडपट्टीत वाटप करण्याचा उपक्रम राबवला. यावेळी फराळही वितरित करण्यात आला.
गेले अनेक वर्षे मंडळाच्या सदस्यांना लोटे एमआयडीसी परिसरात झोपडपट्टीतील मुले अस्ताव्यस्त कपड्यात निदर्शनास येत होती. झोपडपट्टीत पाहणी केली असता मुले थंडीच्या हंगामातही अशा अवस्थेत झोपत असल्याचे लक्षात आहे. याची दखल घेत सदस्यांनी झोपडपट्टीतील २० ते २५ मुलांना फराळ व स्वेटर वाटप केले.
यावेळी उपाध्यक्ष कमलेश पवार, सचिव रोशन खताते, सहसचिव राजेंद्र मगरे, सल्लागार किरण ठसाळे, सदस्य तुषार खताते, मनीष वाडकर, रितीक पाष्टे, विक्रम पवार प्रिन्स सिंग उपस्थित होते.