खेड(प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटानजीक ७ लाख ३३ हजार रूपये किंमतीच्या २२ किलो जप्त केलेल्या गांजा वाहतूक प्रकरणी पसार झालेल्या संशयिताचा पोलादपूर पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाकडून कसून शोध जारी आहे.
गांजा वाहतूक प्रकरणात मोठे रॅकेट असण्याच्या शक्यतेने पोलादपूर पोलिसांकडून साऱ्या शक्यतांचा
पडताळाबकरण्यात येत आहे.
गांजा वाहतूकप्रकरणी मंगेश मधुकर भिलारे (२७, गुरेघर- महाबळेश्वर) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा सहकारी विक्की विजय गोस्वामी उर्फ छोट्या (रा. शाहूनगर-पाचगणी, सातारा) हा संशयित पलायन करण्यात यशस्वी ठरला.गांजा वाहतुकीसाठी वापरलेली ८ लाख रूपये किंमतीची २४/ बीएच १५९३ जे क्रमांकाची ब्रिझा कार पोलादपूर पोलिसांनी हस्तगत केली आहे. पसार झालेल्या संशयिताच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध ठिकाणी पोलीस पथके पाठवण्यात आल्याचे समजते.









