माखजन |वार्ताहर : रत्नागिरी येथील अ.के.स.रा. देसाई अध्यापक विद्यालयाचे प्रा. कै. नामदेव महादेव कुंभार यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी अल्पशा आजाराने गुरुवार दि.१६ रोजी निधन झाले. त्यांनी पाली येथून आपल्या अध्यापक सेवेला सुरवात केली त्यानंतर ते रत्नागिरी येथील अ. के. स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते . सद्या ते सेवा निवृत्तीची नंतर कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील म्हालसवडे या आपल्या मूळ गावी कुटुंबासह रहात होते. त्यांचे अनेक विध्यार्थी महाराष्ट्राभरात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी आपल्या अध्यापन कालखंडात सातशेच्या वर विविध विषयावर व्याख्याने दिलीत.ते रत्नागिरी जिल्ह्यासह जिल्हा बाहेर हि उत्तम व्याख्याते म्हणून प्रसिद्ध होते.त्यांना अनेक कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात येत होते.त्यांनी आपल्या अनुभवातून तीन पुस्तकांचे लेखन करून प्रकाशन केले. अचानक त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखा चा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा, मुली, सुन असा परिवार आहे.










