माजी आमदार संजय कदम यांना धक्का, राष्ट्रवादीसह मनसे कार्यकर्त्यांचाही समावेश
खेड (प्रतिनिधी) ‘उबाठा’ गटाच्या शिवसेनेचे माजी आमदार संजय कदम यांचे गाव असलेल्या तालुक्यातील चिंचघर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. माजी आमदार संजय कदम यांच्यासाठी हा धक्काच मानला जात आहे. प्रवेशकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीसह मनसे कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.
दीपावलीच्या मुहूर्तावर चिंचघर गटात झालेल्या भगवा मेळाव्यात केलेल्या प्रवेशकर्त्यांमध्ये प्रकाश कदम, मधुसुदन कदम, संदीप घाग, समीर सावंत, ओमकार कदम, मंगेश कदम राहुल कदम, अक्षता कदम, प्रणिता कदम, राजेंद्र शिंदे, अनिल शिंदे, रोशन कदम, प्रणिता कदम, राजेंद्र शिर्के, अनंत शिर्के, अविनाश गोळे, राकेश शिंदे, संतोष जाधव,
शाम चव्हाण, पारस जाधव, जालिंदर मोहिते, संतोष जाधव यांच्यासह राष्ट्रवादी व मनसे कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, माजी जि.प.सदस्य अरूण कदम, तालुका संघटक महेंद्र भोसले, माजी सभापती रामचंद्र आईनकर, उद्योजक बावा चव्हाण आदी उपस्थित होते.