आबलोली l वार्ताहर :गुहागर तालुक्यात विशेष करुन दुर्गम भागात आणि डोंगराळ भागातील भरमसाठ जंगलतोड होत असल्यामुळे पर्यावरणाचा -हास होत असून पावसाचे प्रमाण कमी होत असून सुका दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामूळे शेतीचे प्रमाण घटले असून गुहागर तालुक्यात बेकायदेशीर लाकुड तोड करणारे व परिमंडळ वनअधिकारी गुहागर तसेच विभागीय वनअधिकारी चिपळूण तसेच परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी हे एकमेकांशी संगनमत करुन पर्यावरणाचा -हास करीत असून गुहागर तालुक्यातील भरमसाठ आणि बेसुमार जंगलतोडीमुळे वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे वाटचाल सुरू झाली असून बचतगटाच्या माध्यमातून शेती करणा-या व वैयक्तिक शेती करणा-या शेतकऱ्यांच्या शेतीचे व बागायतीचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे त्यामूळे शिवस्वराज्य शेतकरी संघटना तालुका गुहागर हि शेतकरी संघटना शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी आक्रमक झाली असून वनविभागाने जंगलतोड करणा-यांवर त्वरीत कारवाई करावी अन्यथ: आंम्ही तुमचे विरोधात शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषणासारखी टोकाची भूमिका घेऊन आंदोलन करावे लागेल याला सर्वस्वी जबाबदार आपणच रहाल असा गंभीर इशारा शिवस्वराज्य शेतकरी संघटना तालुका गुहागर या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.आनंद गोविंद भोजने यांनी मान.परिक्षेत्र वनअधिकारी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी यांना लेखी निवेदन दिले आहे.











