मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वराड पालववाडी येथील सौ. प्रमोदिनी विनायक तळेकर (वय ५८) या महिलेचा मृतदेह परिसरातील विहिरीत गुरुवारी दिसून आला. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौ. प्रमोदिनी तळेकर यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी रात्री प्रमोदिनी या कुणालाही नसांगता घरातून बेपत्ता झाल्या. कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता त्यांचा मृतदेह वराड पालववाडी येथील नजीकच्या विहिरीत तरंगताना आढळून आला. याबाबत तिचे दीर अनंत तळेकर यांनी कट्टा पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी पुढील कार्यवाही केली. प्रमोदिनी यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुनील चव्हाण हे अधिक तपास करत आहेत.