आ. दीपक केसरकर यांच्याकडून दोडामार्गात जळीत दुकानांची पाहणी

नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात

दोडामार्ग l प्रतिनिधी :दोडामार्ग बाजारपेठेतील बॉम्बे टेक्सटाइल या कपड्यांच्या शोरुमला गुरुवारी सकाळी आग लागली होती. आगीच्या भडक्यात भडका शोरूम समोर असलेल्या अन्य दुकानांही त्याची झळ बसली. या दुकानांची आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेत पाहणी केली. त्यांनी आपल्या वैयक्तिक स्तरावरून आर्थिक मदतही दिली.

 

येथील बाजारपेठेतील सावंतवाडी रोडवर असलेल्या बॉम्बे टेक्सटाइल या शोरुमला गुरुवारी आग लागली होती. नगरपंचायतचा बंब घटनास्थळी वेळीच येऊन आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.

 

आगीत बॉम्बे टेक्सटाइलचा संपूर्ण दर्शनी भाग जळाला. तसेच शोरूमच्या आतमधील भाग धुराने भरून गेला होता. आमदार दीपक केसरकर यांनी दुकाने जळालेल्या व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या दुकानांची पाहणी केली. यावेळी त्यांनी काही जणांना वैयक्तिक स्वरूपात आर्थिक मदत दिली.

 

यावेळी दत्तराज मळीक, बाबू मळीक, सुहास करमळकर, पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, नगरध्यक्ष चेतन चव्हाण, नगरसेवक संतोष नानचे, उपजिल्हाप्रमुख शैलेश दळवी, सज्जन धाऊस्कर, चिरायू गवस यासह अनेक व्यापारी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.