चंद्रावती कवडेकर यांचे निधन

ओटवणे । प्रतिनिधी :
चराठा नमसवाडी येथील रहिवाशी सौ. चंद्रावती रावजी कवडेकर (८८) यांचे बुधवारी १८ जानेवारीला रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. गुरुवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील रावजी कवडेकर यांच्या त्या पत्नी होत तर ठिंबक सिंचन व स्प्रिंकलर स्पेशालिस्ट शंकर कवडेकर तसेच गोविंद व प्रकाश कवडेकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.