लोटे औद्योगिक वसाहतीतील संशोधन, विकासकेंद्राचे २५ रोजी उद्घाटन

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सतीश वाघ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुप्रिया हाऊस या संशोधन व विकास केंद्राचे . २५ रोजी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे.

या कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, गुहागरचे आमदार भास्कर जाधव, चिपळूणचे आमदार शेखर निकम आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत लाईफ सायन्स या कंपनीचे औद्योगिक क्रांती घडवणारे विकासात्मक अनेक प्रकल्प भविष्यात आरंभ होतील, असा आशावाद औद्योगिक क्षेत्रातील अनेकांनी व्यक्त केला आहे.