जामसंडे मळई येथील भजनी बुवा व देवगड तालुका भजन मंडळाचे अध्यक्ष सदानंद पांडूरंग बांदकर(७७) यांचे सोमवारी सायंकाळी ७.१५ वाजता मळई येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचा पश्चात पत्नी, तीन मुली, जावई,नातवंडे, भाऊ असा परीवार आहे.देवगड तालुका भजनी मंडळाचे अध्यक्ष या पदावर ते सध्या कार्यरत होते.देवगड तालुका भजन मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी वार्षिक मेळावे आयोजनाचे नियोजन ते चांगल्या पध्दतीने करीत होते.तालुक्यातील सर्व भजनी बुवांना एकत्रित करून भजन मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात त्यांचे मोठे योगदान होते.हाडाचे शीक्षक, उत्कृष्ट संगीतकार, नाट्य दिनदर्शक अशा शांत, मीतभाषी बांदकर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता मळई येथील निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा नीघणार आहे.












