साध्या वेशातील पोलिसांकडून शहरात गस्त
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरासह तालुक्यात बेकायदा दारुसह अंमली पदार्थ व अन्य अवैध धंदे वाढल्याची तक्रार राजकीय पक्षांकडून होत असल्याने आता या विरोधात पोलिसांनी छुपी मोहीम हाती घेतली आहे. सावंतवाडी शहरातील काही भागांमध्ये साध्या विषयातील पोलीस गुप्तपणे गस्त घालत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सावंतवाडी शहरात बेकायदा दारू तसेच अन्य अवैध धंदे वाढीस लागल्याची तक्रार पत्रकार परिषदेद्वारे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली होती. त्याचप्रमाणे मनसे पदाधिकाऱ्यांनीही त्याबाबतचे निवेदन पोलीस प्रशासनाला सादर केले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता याची गंभीर दखल घेतली असून या अवैध धंद्याविरोधात मोहीम उघडल्याचे निदर्शनास आले आहे.
यासाठी साध्या विषयातील पोलिसांकडून शहरातील काही भागांमध्ये गुप्तपणे गस्त घातली जात असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. पोलीस प्रशासनाने अशी कठोर भूमिका घेतल्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून यामुळे बेकायदा दारू अमली पदार्थ व अन्य अवैध धंद्यांना आता तरी आळा बसेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
Sindhudurg












