सार्था गवाणकर राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेत द्वितीय

माखजन |वार्ताहर : SCERT राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेत मूळ राजापूर ची आणि सध्या रत्नागिरी च्या पटवर्धन हायस्कुल ला शिकणारी कु.सार्था नरेंद्र गवाणकर हिने द्वितीय क्रमांक पटकवला.ही स्पर्धा SCERT राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे स्पर्धा झाली.एकूण राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून एक असे ३६ स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धकातून सर्वोत्तम गायकी करून दुसऱ्या क्रमांकावर सार्था ने मोहोर उमटवली.

 

सार्था ही पटवर्धन हायस्कुल रत्नागिरी येथे इयत्ता नववी मध्ये शिकत आहे.सार्था,रत्नागिरीतील प्रख्यात गायिका सौ मुग्धा भट सामंत यांच्या कडे शास्त्रीय संगीताचे गेली ७ वर्षे शिक्षण घेत आहे. सार्था च्या सुमधुर आवाजाची सध्या रत्नागिरीतील श्रोतू वर्गाला मोहिनी आहे.एक उदयोन्मुख गायिका म्हणून तिच्या कडे पाहिलं जात आहे.सार्था च्या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.