शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर आंबेरी चव्हाटा ते तेलीवाडी रस्ता तसेच आंबेरी राउतवाडी मार्ग खडीकरण डांबरीकरण करणे या कामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यात जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत आंबेरी चव्हाटा ते तेलीवाडी रस्ता खडीकारण डांबरीकरण करणे तसेच आमदार निलेश राणे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत आंबेरी राउतवाडी मार्ग ग्रामा 405 खडीकरण डांबरीकरण करणे यासाठी निधी मंजूर झाला. या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिप माजी सभापती संतोष साटविलकर, शिवसेना विभागप्रमुख राजन माणगावकर, आंबेरी सरपंच मनोज डिचोलकर, उपसरपंच रवींद्र परब, सदस्य सिद्धू डिचोलकर, पूर्वा मुसळे,सुचिता कांबळी,
ग्रामस्थ गीता पाटणकर, निकिता वाक्कर, निलेश मुसळे, बाळू मुसळे, तात्या नांदोस्कर, समिर मांजरेकर, सुशांत वाक्कर,समिर मुणगेकर, शरद गोसावी, बंबी गोसावी, ज्ञानदेव कोजरेकर, सिद्धू कोजरेकर, योगेश वाक्कर, निखिल वाक्कर, अमोल वाक्कर, प्रवीण वाक्कर, शेखर वाक्कर, बाबल वाक्कर, नीलकंठ चव्हाण, शंकर खोत, शिवराम आंबेरकर, अमित डिचोलकर, पीयूष मेस्त्री, बाळू वाक्कर, रोहन डिचोलकर, अभय केळूस्कर, आपा राऊत, राजन परब, तन्मय परब, जयेश तावडे, अभी कांबळी, विजू तावडे, बाबा कुलकर्णी, संजय कुलकर्णी, दादा डिचोलकर, ओंकार पाटणकर, श्रीपाद वाक्कर, किशोर वाक्कर, आपु आजगावकर यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.












