सरपंच आपल्या दारी

Google search engine
Google search engine

नुतन पळसंब सरपंचांचा गावविकासासाठी अभिनव उपक्रम

आचरा | अर्जुन बापर्डेकर : गावातील नागरिकांच्या गरजा आणि समस्या समजून घेऊन त्यांचे लिखित स्वरूपात संकलन करायचे आणि या माहितीच्या आधारावर येत्या काळात गाव वासीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यायचा या साठी नुतन पळसंब सरपंच महेश वरक यांनी सरपंच आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबवित पळसंब गावात घरोघरी फिरुन माहिती संकलन करण्यासाठी पत्रकांचे वाटप केले.

या गावभेट कार्यक्रमांतर्गत पळसंब गावातील प्रत्येक कुटुंबा गणिक एक पत्रक तयार करून ग्रामपंचायत मार्फत देण्यात येत आहे हे पत्रक प्रत्येक कुटुंबाने परिपूर्ण भरून रविवारी 22 जानेवारी 2023 रोजी वार्ड निहाय नेमून दिलेल्या ठिकाणी एकत्रित पणे आणून द्यायची आहेत. या माहितीच्या आधारावर येत्या काळात गाव वासीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यायचा या साठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सरपंच महेश वरक यांनी सांगितल.या गावभेट कार्यक्रमात पळसंब सरपंच महेश वरक यांच्या सह उपसरपंच अविराज परब, भारतीय जनता पक्षाचे भटके विमुक्त आघाडी जिल्हा संघटन मंत्री सुनील खरात, सुभाष तर्फे, सुहास सावंत, अरुण माने, मधुकर कदम, ग्रामपंचायत कर्मचारी शैलेश अनावकर आदी सहभागी झाले होते.