इंद्रधनु मित्र मंडळ खेरवसे जाधववाडी यांच्या वतीने आयोजन
लांजा | प्रतिनिधी : तालुक्यातील खेरवसे जाधववाडी येथील इंद्रधनु मित्र मंडळ खेरवसे जाधववाडी यांच्या वतीने बुधवार दिनांक २५ जानेवारी रोजी श्री माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या या माघी गणेश जयंती उत्सव अंतर्गत दिनांक २५ रोजी सकाळी नऊ वाजता वाजत गाजत गणरायाच्या आगमन होणार आहे. त्यानंतर दहा वाजता श्री गणरायाचे पूजन आणि सत्यनारायणाची महापूजा असे कार्यक्रम होतील. दुपारी १२ वाजता महाआरती, त्यानंतर एक ते तीन महाप्रसाद, दुपारी ३.०० वाजता हळदीकुंकू, सायंकाळी ७ वाजता आरती, रात्र नऊ वाजता स्थानिक भजन व त्यानंतर १०.०० वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम कार्यक्रम होणार असून रात्री ११.०० वाजता श्री सोंबा रारोबा रामकृष्ण नमन मंडळ मोर्डे गवळीवाडी यांचे बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होणार आहे .दिनांक २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता आरती आणि त्यानंतर तीन वाजता मिरवणुकीने श्री गणेशाचे विसर्जन केले जाणार आहे. तालुक्यातील भाविकांनी या माघी गणेशोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन इंद्रधनु मित्र मंडळ खेरवसे जाधव वाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.