श्री गणेश नवतरुण सेवा ग्राम विकास मंडळ आरगाव च्या वतीने माघी गणेशोत्सवाचे आयोजन

Google search engine
Google search engine

लांजा | प्रतिनिधी : तालुक्यातील आरगाव येथील श्री गणेश नवतरुण सेवा ग्राम विकास मंडळाच्या वतीने मंगळवार दिनांक २४ ते २५ जानेवारी या कालावधीत मागी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या माघी गणेशोत्सवा अंतर्गत दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता गणेश पूजन, नऊ वाजता ब्राह्मणदेव अभिषेक, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ ,ह. भ. प. चंद्रकांत खंडागळे बुवा यांचे कीर्तनाचा कार्यक्रम रात्र नऊ वाजता होईल. बुधवार दिनांक २५ रोजी सकाळी ७ ते ८ श्रींचा अभिषेक व पूजा, त्यानंतर कीर्तन, दुपारी १२.०० वाजता जन्मोत्सव, स्वागत समारंभ, दुपारी १.३० ते ३ या वेळेत महाप्रसाद, त्यानंतर ३.३० वाजता महिलांचा हळदीकुंकू समारंभ ,सायंकाळी ४.३० वाजता सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ६.३० वाजता दीपप्रज्वलन आणि पालखी मिरवणूक पार पडणार आहे.
संपूर्ण कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी श्री गणेश नवतरुण सेवा ग्राम विकास मंडळ आरगाव चे सर्व पदाधिकारी ,ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.